रावेर :- सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून अत्याचाराची हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. १४ वर्षीय मुलगीवर ४० वर्षीय व्यक्तीचा जबरदस्ती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ऐनपूर शिवारात घडलीय. याबाबत याबाबत दोन जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात पोक्सो व ॲस्ट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना
रावेर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे १४ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनीवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी आणि तिच्या ओळखीची रमाबाई अमोल अवसरमल हे दोघे ऐणपूर शिवारात काड्या तोडण्यासाठी गेल्या. त्याठिकाणी संशयित आरोपी नितीन मधुकर पाटील रा. ऐनपूर ता.रावेर हा तिथे दुचाकीवर आला. त्यानंतर माझ्यासोबत चल असे सांगून तिचा हात पकडून तिच्यावर अत्याचार केला.
यासाठी रमाबाई अवसरमल यांनी देखील प्रोत्साहित केले. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नितीन मधुकर पाटील आणि रमाबाई अमोल अवसरमल दोघे रा. ऐनपूर ता. रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






