कारंजा घाडगे । प्रतिनिधी
कारंजा (घा):-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व वूशु स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कूल व जुनियर कॉलेज कारंजा घाडगे येथे वुशू मार्शल- आर्ट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरा मध्ये शाळेतील 150 विद्यार्थी सहभागी झाले होते.
पंधरा दिवसाच्या या शिबिरामध्ये वुशु या खेळाचे महत्व व फायदे आणि वूशू खेळा बद्दल अधिक माहिती सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले. दिनांक 20 सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी या शिबिराचे समापण करण्यात आले व शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमा ला प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका माने , राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूरच्या अध्यक्षा व शाळेच्या संस्थापिका अरुणा चाफले, मुख्यधापक जनार्दन धोटे व वूशु स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश राऊत उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सर्व १५० विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आला.या शिबीराचे प्रशिक्षण राज्यस्तरीय वूशू खेडाळू शिवानी देवासे व रजत देवासे यांनी दिले.या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन रोशन बोबडे यांनी केले तर आभार रजत देवासे यांनी मानले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- Viral Video: भररस्त्याच्या धावत्या बाईकवरच पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने धू धू धुतलं, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- प्रेम आंधळं असतं ! ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने 8 वी नापास झालेल्या युवकांशी केलं लग्न, काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा….
- धक्कादायक! सप्तशृंगगडाच्या शितकड्यावरून उडी घेत तरुण-तरुणीने संपविले जीवन.मृत्यूचे कारण अस्पष्ट.
- एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-
- Viral Video:रस्त्यावरुन जाणाऱ्या बुरखाधारी महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं अन् केला ‘किस’ युवकास पोलिसांकडून चोप पहा व्हिडिओ.