पारोळा प्रतिनिधि विशाल महाजन
येथील संत शिरोमणी नरहरी सोनार बहुउद्देशीय विकास संस्था पारोळा, साईबाबा परिवार,नेहरू युवा केंद्र पारोळा व पारोळा तालुका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने स्व.अमित चारुदत्त मोरे यांच्या 12 व्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर प्रसंगी तब्बल 47 रक्तदात्यांनी सहभागी होत या राष्ट्रीय सामाजिक कार्यात आपले योगदान दिले.
गेल्या अकरा वर्षापासून साईबाबा परिवाराच्या वतीने अखंडित पणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. चारुदत्त मोरे यांचा चिरंजीव अमित मोरे यास रक्ताच्या तुटवड्यामुळे आपला जीव गमवावा लागला होता. इतरांवर तो प्रसंग येऊ नये. रक्तामुळे इतरांना जीवदान मिळावे. या सामाजिक भावनेतून हा रक्तदान शिबिराचा महायाग अखंडितपणे सुरू असल्याचे श्री मोरे यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिर प्रसंगी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक स ध भावसार प्राथमिक शिक्षक गुणवंत पाटील, व्ही एम पाटील, आचार्य के.बी. रणधीर एरंडोलचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, नगरसेवक रोहन मोरे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, विश्वास कोळी, विजय सोनवणे, भगवान पाटील, गिरीश वाणी, रवींद्र पाटील, डॉ. रवींद्र सोनार, अशोक विसपुते,पत्रकार रावसाहेब भोसले ,अभय पाटील, रमेश जैन, योगेश पाटील, संजय पाटील, अशोक ललवाणी, राकेश शिंदे यांच्यासह साईबाबा परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.
रक्त संकलनासाठी नवजीवन ब्लड बँक धुळे डॉ सुनील चौधरी जळगाव सिव्हिल चे डॉ दीपक पाटील जीवन ज्योती ब्लड बँक धुळे डॉ ज्ञानेश्वर पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित मान्यवरांनी रक्तदान शिबिराचा या सामाजिक उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले.
यशस्वीतेसाठी योगेश पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, सागर रणधीर यांनी सहकार्य केले.