मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर भारतीय संघ आज पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी तयार झाला. नागपूरच्या क्रीडांगणावर भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे वेळ गेल्यामुळे सामना ८ षटकांचा खेळवण्यात आला.कर्णधार अारोन फिंच आणि कॅमेरुन ग्रीन यांनी खेळास सुरूवात केली.
अक्षर पटेलने टाकलेल्या सामन्याच्या दुसर्या ग्रीन ५ धावांवर बाद झाला. बर्याच काळानंतर क्रिकेटचा चेंडू विराट कोहलीच्या हातात आला आणि त्याने ग्रीनला धावचीत केले. त्याच षटकात ग्लेन मॅक्सवेलचा त्रिफाळा अक्षरने उध्वस्त केला. अक्षरने सामन्याच्या चौथ्या षटकात टिम डेव्हिडचा २ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. फिंच चांगला खेळत असताना बुमराहने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याने चार चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १५ चेंडूंत ३१ धावा काढल्या. मॅथ्यू वेड आणि स्टिव्हन स्मिथ यांनी निर्णायक भागीदारी रचली. त्यांनी केवळ १८ चेंडूंत ४४ धावा काढल्या.
डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्मिथला हर्षल पटेलने धावचीत केले. मॅथ्यू वेडने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २० चेंडूंत नाबाद ४३ धावा काढल्या. त्यामुळे भारतापुढे ९०/५ अशी भक्कम धावसंख्या ते उभारू शकले.
भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. दोघेही मेदानाच्या दाही दिशांना जोरदार फटके लगावत होते. डावाच्या पहिल्याच षटकात हेझलवूडच्या गोलंदाजीवर रोहीतने २ तर राहुलने एक षटकार मारत त्यांचे इरादे स्पष्ट केले. पॅट कमिन्सच्या पुढच्या षटकात रोहितने एक षटकार लगावला. गोलंदाजीत बदल करून अॅडम झंम्पाला आणण्यात आले. रोहितने त्याला षटकार लगावला. पण त्याच षटकात झंम्पाने राहुलचा त्रिफाळा उध्वस्त केला आणि ३९ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
त्याच्याजागी विराट कोहली खेळपट्टीवर उतरला. पुन्हा गोलंदाजीत बदल करत डॅनियल सॅम्सला आणण्यात आले. त्याला रोहित विराटने प्रत्येकी एक चौकार मारला. भारताला विजयासाठी २४ चेंडूंत ४० धावांची गरज होती. झंमपाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणाऱ्या विराटचा पुढच्याच चेंडूवर त्रिफाळा उध्वस्त झाला. फलंदाजीतलं त्याचं अपयश भारताला प्रत्येकवेळी छळत आहे. अजूनदेखील त्याला विश्वचषकात त्याला न खेळवण्याचा निर्णय निवड समितीने घ्यायला पाहिजे. पुढच्याच चेंडूवर झंम्पाने सूर्यकुमार यादवला पायचीत पकडले. रोहित आणि हार्दिकला विजयासाठी अखेरपर्यंत खेळावे लागणार असे दिसते.
भारताला विजयासाठी १८ चेंडूंत ३३ धावांची गरज होती. पुन्हा गोलंदाजीत बदल करत सिन अॅबॉटला चेंडू दिला गेला. रोहितने त्याच्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार लगावले. भारताला विजयासाठी १२ चेंडूंत २२ धावांची गरज होती. पुन्हा पॅट कमिन्सच्ता हाती चेंडू सोपवण्यात आला. हार्दिकने त्याला चौकार लगावला. दोनच चेंडूंनंतर कमिन्सने त्याला ९ धावांवर बाद केले. त्याच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने चौकार लगावला. भारताला विजयासाठी ६ चेंडूंत ९ धावांची गरज होती. दिनेश कार्तिक शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू खेळत होता. आणि सॅम्सला षटकार लगावत अापलं खातं उघडलं. पुढच्या चेंडूवर चौकार लगावत सामना भारताच्या खिशात घातला. चार चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने रोहितने २० चेंडूंत नाबाद ४६ धावा काढल्या तर केवळ दोन चेंडूंत कार्तिकने नाबाद १० धावा काढल्या. भारताने सामना ६ गडी आणि ४ चेंडू राखून जिंकला. आणि मालिकेत १-१ बरोबरी साधली.
रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने २० चेंडूंत नाबाद ४६ धावा काढल्या होत्या. तो टी२०च्या षटकारांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. त्याने आजपर्यंत १७६ षटकार मारले आहेत. मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे होणार आहे.
हे वाचले का?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.