एरंडोल शहरातील 14 ग्रामीण भागातील 11 असे 25 रुग्णांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह-
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 11 महिन्याच्या बालकाचा समावेश.

Spread the love


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे आज दिनांक 17 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 55 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 14 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे. यामध्ये शहरातील अकरा महिन्याचा बालकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बालकाची आई व 4 वर्षाचा भाऊ या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागात 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे तर तालुक्यात एकूण 25 रुग्णांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आढळून आला.

आढळून आलेल्या रूग्णांमध्ये शहरातील माळीवाडा परिसरातील 23वर्षीय महिला,कागदी पुरा परिसरातील 55 वर्षीय पुरुष, रामचंद्र नगर परिसरातील 19 वर्षीय युवक, रेणुका नगर परिसरातील 39 वर्षीय पुरुष, ओम नगर परिसरातील 47 पुरुष व 18 वर्षीय युवती,श्रीराम कॉलनी परिसरातील 40 वर्षीय पुरुष, परदेशी गल्ली परिसरातील 26 वर्षीय पुरुष, मारवाडी गल्ली परिसरातील 35 वर्षीय पुरुष, पांडव वाडा परिसरातील 47 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय वृद्ध पुरुष गजमल नगर परिसरातील 24 वर्षीय पुरुष व याच परिसरातील 11 महिन्याचे बालक असे शहरातील 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ग्रामीण भागातील पिंपळकोठा येथील 18 वर्षीय युवती, 25 वर्षीय पुरुष,36,व 34 वर्षीय महिला नंदगाव येथील 40 वर्षीय महिला मराठखेडा येथील 52 वर्षीय पुरुष पिंपळकोठा प्र.चा.28 वर्षीय पुरुष व कासोदा येथील एकाच परिवारातील 47 वर्षीय पुरुष,43 वर्षीय महिला,17 व 18 वर्षी युवक असे ग्रामीण भागातील 11 असे शहर व ग्रामीण भागातील एकूण 25 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
434 नागरिकांचे rt-pcr टेस्टचे अहवाल पेंडिंग होते त्यापैकी 173 नागरिकांचे अहवाल आज प्राप्त झाले त्यामध्ये सर्व नागरिकांच्या अहवाल निगेटिव्ह आला आहे.

टीम झुंजार