धरणगाव प्रतिनिधी –
पिंप्री खु :- धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील त्रिरत्न अकॅडमी येथे शिवराज्याभिषेक व सत्यशोधक समाज स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षात पदार्पण केल्या निमित्त राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे सतीश शिंदे सर यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.
त्रिरत्न अकॅडमीचे संचालक आदर्श शिक्षक सतीश शिंदे सर यांनी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे जीवन कार्य सांगून सत्यशोधक समाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्लासच्या विद्यार्थ्यांनी संत कबीर, जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इ.महानायकांचे चित्र रंगवुन रंगभरण स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रिरत्न अकॅडमीचे संचालक सतीश शिंदे सर यांच्याकडून अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.