आईच्या प्रेमाहून जगात काहीच मोठं नाही असं म्हणतात, मग ती आपली आई असो वा एखाद्या प्राण्याची. आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी आई सदैव तत्पर असते. एक क्षण जरी बाळ नजरेआड गेलं तर आईच्या जीवाची ही घालमेल होते ती शब्दात सांगता येणार नाही. असंच एका आईचं बाळ काही दिवसांपासून सज्जनगडावर हरवलं होतं आणि अखेरीस एका मध्यरात्री या माय- लेकाची गाठ झालीच. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या आणि तिच्या पिल्लाची भेट पाहायला मिळतेय.
आईचं प्रेम काय असतं हे आपल्याला कोणी वेगळं सांगायची गरज नाही. कारण आपण प्रत्येक जण त्याचा अनुभव घेतच असतो. आता माणसांमध्येच प्रेमभावना असते असे कदाचित आपल्याला वाटू शकेल. पण प्राण्यांमध्येही ही प्रेमाची भावना तितकीच असते, मग ते पाळीव प्राणी असोत किंवा जंगली. जंगलातील प्राणी हिंस्र असतात असा आपला समज असतो. मात्र त्यांच्यातही मायेचा झरा असतोच. विशेषत: आई म्हणून पिलांना जन्म देणाऱ्या प्रत्येक सजीवामध्ये हा ममतेचा झरा असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये एक बिबट्या आपल्या पिल्लाला तोंडात धरुन सुरक्षित ठिकाणी ठेवताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मातृप्रेमाविषयच्या चर्चांनी वेग धरला आहे. भारतीय वनाधिकारी परवीन कस्वान यांनी नुकताच हा व्हिडिओ ट्विट केला असून व्हिडिओच्या सुरुवातीलाच बिबट्या आपल्या बछड्याला तोंडात धरुन घेऊन जाण्याच्या बेबात असल्याचे दिसते. मग काही सेकंदांसाठी बिबट्या बछड्याला खाली ठेवतो. आणि मग बिबट्या या बछड्याला तोंडात पकडून झाडीत जाताना दिसतो. मांजर ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना तोंडाने मानेत पकडते त्याचप्रमाणे बिबट्याही आपल्या जबड्यात या बछड्याला पकडताना दिसतो.
पहा व्हिडिओ :
बिबट्याच्या माय-लेकाची भेट
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, व्हिडिओला ४३, ००० पेक्षा जास्त व्ह्यूज आणि २,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक युजर्सनी पोस्ट रिट्विट केली आहे.
या व्हिडिओला कॅप्शन देताना कस्वान लिहीतात, “आई आली आणि बछड्याला घेऊन गेली त्यामुळे तो सुरक्षित झाला, याहून सुंदर आणखी काय असू शकते.” म्हणजे हा बिबट्या बछड्यांना ठेवून शिकार करण्यासाठी किंवा अन्य काही गोष्टींसाठी जंगलात गेला होता. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. बऱ्याच जणांनी तो रिट्विट केला असून आई आणि मुलाच्या नात्याविषयी किंवा प्रेमाविषयी आपल्या भावना या माध्यमातून लोकांनी व्यक्त केल्या आहेत.
हे वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






