पारोळा :- राष्ट्रीय महामार्ग क्र सहवर ट्रक चालक नामे नंदूसिंग धनसिंग महेर रा वादीखुर्द ता भोकरदन जि जालना हे ट्रक मालक मंगलसिंग फुलसिंग राजपूत रा बोरगाव बाजार ता सिल्लोड जि. औरंगाबाद यांचे सोबत भरुच गुजरात येथून मीठ भरून मेहकर येथे येत असतांना धुळे ते पारोळा दरम्यान विचखेडा जवळ ट्रक पंचर झालेने टायर खोलत असतांना दि 27/9/2022 चे रात्री 02/00 वाजताचे दरम्यान धुळे कडून एक मोटरसायकल स्वार आला व म्हणाला की,मुझे जळगाव जाना है,मै धुलियासे आया हु,रातका टाइम है,मुझे डर लगता है,असे म्हणून थोडावेळ तेथेच थांबला त्याने त्याचे जवळील रामपुरी चाकू काढला व म्हणाला की,मला 500 रुपये द्या तेव्हा ट्रक मालक मंगलसिंग यांनी त्यांचे जवळील 800/-रुपये काढले व ते सर्व रुपये मगितलेने देऊन टाकले त्यानंतर ड्राइवर नंदूसिंग यांचे गळ्यातील चांदीची चैन दिसलेने तीही जबरीने मगितलेने चांदीची चैन व मोबाईल घाबरून देऊन टाकला त्यानंतर चोरटा निघून गेला
परत येऊन मोबाईल चा पॅटर्न लॉक खोलून मागितला असता फिर्यादी यांनी पॅटर्न लॉक न सांगता त्यांचा आरोपीने घेतलेला मोबाईल हिसकावून घेतला असता आरोपीने त्याचे जवळील चाकू काढला व उजवे बोटाचे अंगठ्यास गंभीर जखमी केली व आणखी मारण्याचा प्रयत्न करीत असता ट्रक मालक मंगलसिंग यांनी चोरत्यास मागून पकडले असता चोरट्याने मंगलसिंग यांचे पोटात चाकू खुपसलेने प्राणघातक गंभीर जखमी झाले तेव्हा नमूद चोरटयास फिर्यादीने सुद्धा स्वतः चा बचाव करणे करिता लाकडी ठोकळा आरोपीचे तोंडावर मारला असता आरोपी सुद्धा जखमी झालेने पळून गेला. फिर्यादी यांनी 112 डायल कॉल केलेने तात्काळ रात्रगस्त चे API निलेश गायकवाड,ASI उदयसिंग साळुंके ,पो हे कॉ किशोर पाटील,पो कॉ किशोर भोई ,होम गार्ड चेतन पाटील असे घटनस्थळी पोहचले ,व जखमीस तात्काळ कुटीर रुग्णालय येथे दोन्ही जखमींना आणले व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना खबर देताच हॉस्पिटल येथे पोहचून जखमींची विचारपूस केली.
अनोळखी चोरट्याने वर्णन विचारले व तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली,API निलेश गायकवाड,PSI राजू जाधव,PSI शेखर डोमाले,रात्रगस्तचा सर्व स्टाफ व डीबी चे कर्मचारी यांना तात्काळ बोलावून तपासाचे चक्र पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी फिरविले व तीन पथक तयार करून एक पथक घटनास्थळी व पारोळा येथे व दोन पथक एरंडोल व जळगाव चे दिशेने स्वतः सह तात्काळ रवाना होऊन पारोळा माथा येथे एक ट्रक उभा दिसला त्या ट्रक चालकास विचारपूस करता तर पंचर झालेने सांगितले व एका इसमाने मोटर सायकल वर येऊन चाकू दाखवून 100/-रुपये जबरीने घेतले व जळगाव कडे गेला असून त्याचे डोक्यास जखम झालेली दिसली म्हणून एरंडोल,जळगाव कडील सर्व
धाबे,पेट्रोलपंप चेक करीत जात असता सावखेडा होळ येथे टँकर चे कॅबिन मध्ये ड्राइवर झोपलेले असताना तकॅबिन मधून मोबाईल व चार्जर कोणीतरी चोरून नेले असे समजले त्या टँकर मधील ड्राइवर 6असं सोबत घेऊन बी बी भार्गव येथील पेट्रोल पंप येथे विचारपूस करता डोक्यास जखम असलेले इसमाने 100/-रुपयांचे पेट्रोल भरले व तेथे रक्त सुद्धा सांडलेले दिसले,CCTV फुटेज हस्तगत केले असता तिसरे पथक सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले,व जिल्हापेठ व एरंडोल पोलिसांशी संपर्क केला व माहिती दिली,MIDC चे PSI गिरासे,व स्टाफ,व जिल्हापेठ पो स्टे चे हे कॉ तुषार जावरे यांची मदत घेऊन आरोपीचा पारोळा पथक API गायकवाड,PSI जाधव व स्टाफ शोध घेत असतांना
इच्छादेवी चौकी जवळ डोक्यास जखम असलेला एक इसम दिसलेने त्यास ताब्यात घेतले व फुटेज मधील इसमांचे साम्य दिसलेने व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल HF DELUX MH 18 AQ 0754 आरोपी जवळच असलेने मोटर सायकल व आरोपीचा फोटो काढून फिर्यादिस दाखविले व फिर्यादीने खात्रीपूर्वक ओळ्खलेने मोटर सायकल,जबरीने चोरलेली 800+100=900/-रुपये सुद्धा व रक्ताने भरलेला चाकू मिळून आलेने आरोपी फिरोज इकबाल शेख रा हल्ली 100 फुटी रोड धुळे,मूळ रा जळगाव तांबापुरा यास नमूद गुन्ह्यात अटक केली व टँकर चे कॅबिन मधून चोरलेला मोबाईल सुद्धा नमूद आरोपीकडे मिळालेने चोरीचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला
ट्रक चालक व मालक याना प्राणघातक हमला करून गंभीर जखमी केलेने कलम 392,394,397,307,IPC प्रमाणे गुन्हा दाखल करून नमूद आरोपीस अवघ्या दोन तासात अटक केली आहे,नमूद आरोपीवर MIDC पो स्टे,नशिराबाद पो स्टे,रेल्वे पोलीस स्टेशन येथे चोरीचे व शरीरविरुद्ध चे गुंह्ये दाखल आहेत, ADD SP रमेश चोपडे 40 गाव,DYSP राकेश जाधव,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,API निलेश गायकवाड,PSI राजू जाधव,PSI शेखर ढोमाळे,अशी साळुंके, हे कॉ किशोर पाटील,हे कॉ सुधीर चौधरी,पो ना संदीप सातपुते,पो कॉ किशोर भोई,पो कॉ अभिजित पाटील,पो कॉ नरेंद्र पाटील, होमगार्ड चेतन पाटील यांनी कामगिरी केली आहे.