मुंबई : – महिंद्रा आणि महिंद्रा या लोकप्रिय वाहन निर्मात्या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते सतत या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर काही ना काही तरी शेअर करत असतात. महिंद्रा यांनी ट्विटरवर काहीही शेअर केलं की ते ट्विट लगेच व्हायरल होतं. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक ट्रक चालत्या फिरत्या लग्नाच्या हॉलप्रमाणे तयार करण्यात आला आहे. हा चालता फिरता लग्नाचा हॉल बघून आनंद महिंद्रा स्वतःला हा व्हिडीओ शेअर करण्यापासून रोखू शकले नाहीत. तसेच महिंद्रा यांनी या ट्रकच्या मालकाची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खरंतर एका ट्रकमालकाने त्याचा ट्रक एका चालत्या फिरत्या लग्नाच्या हॉलप्रमाणे मॉडीफाय केला आहे. चला तर मग हा चालता फिरता लग्नाचा हॉल आपण पाहुया.
चालतं फिरतं मंगल कार्यालय
महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी जो व्हिडीओ ट्विट केला आहे तो ४० फूट लांब शिपिंग कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये अनेक फोल्टेबल भाग आहेत, जे उघडल्यावर एक मोठा लग्नाचा हॉल तयार होतो. 40 X 30 फूट म्हणजेच १२०० चौरस फुटांचा एक हॉल तयार होतो. या हॉलमध्ये २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न तसेच इतर कार्यक्रम देखील होतात.
आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ ट्विट करत ट्रक बनवणाऱ्या व्यक्तीची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, अशा प्रकारचे मंगल कार्यालय गावांमध्ये खूप उपयोगी पडू शकतात. हे पर्यावरणास अनुकूल आहेत तसेच भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या किंवा लोकसंख्येची दाट घणता असलेल्या देशात असे मंगल कार्यालय खूप उपयोगी आहेत, कारण यांना जागा लागत नाही.
पाहा व्हिडीओ :
२०० वऱ्हाड्यांची क्षमता आणि पावसाळ्यात उपयोगी
ट्रक मॉडिफाय करून तयार करण्यात आलेल्या चालत्या फिरत्या मंगल कार्यालयात एकूण २०० लोकांची व्यवस्था सहज करता येते. फोल्डेबल डिझाईनसह यामध्ये दोन एसी देखील लावण्यात आले आहेत. या ट्रकचा वापर लग्नासह इतर अनेक कार्यक्रमांसाठी केला जातो. गावकऱ्यांनी म्हटलं आहे की, हे चालतं फिरतं मंगल कार्यालय केवळ गावखेंड्यामध्ये लग्न करण्यासाठीच नव्हे तर इतरही अनेक कार्यक्रमांसाठी उपयोगी आहे. तसेच पावासाळ्यात देखील हे मंगल कार्यालय उपयोगी आहे. ट्रक आणि व्हिडीओमधील माहितीनुसार हा व्हिडीओ महाराष्ट्रातलाच आहे. हा ट्रक दरेकर इव्हेंट्स या कंपनीच्या मालकीचा असल्याचं बोललं जात आहे.
समाजामध्ये वेगळेपणाची कदर ही केलीच जाते. माणसाच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले की मग त्याचे सोने होते. समाजातील वेगळ्या अशा घटना टिपण्यामध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) हे कायम चर्चेत असतात. ते एक उद्योजक असले तरी सोशल मिडियावरही (Social Media) तेवढेच सक्रिय असतात. यातूनच ते वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करतात. आता त्यांनी असाच एक व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे, जो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. हा एका कंटनेरचा व्हिडिओ (Truck Video) असला तरी त्याचे खास वैशिष्ट आहे. हा कंटेनर साधासुधा नसून यामध्ये लग्नाचा हॉल आहे. ही तुम्हाला अतिशोक्ती वाटत असले तरी वास्तव आहे. ट्रकच्या पाठीमागच्या साईडला तब्बल 200 माणसांची व्यवस्था होईल असा तो हॉल आहे.
हे वाचलंत का ?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.