इकबाल काकर राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love

श्रीरामपुर प्रतिनिधी :- अफजल मेमन

श्रीरामपुर :- येथील अलमिजान शाळेचे उप मुख्याध्यापक तथा काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष इकबाल ईस्माईल काकर यांना निमगाव वाघा (जि.अहमदनगर) येथील किसनराव डोंगरे बहु उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२२” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इकबाल काकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा हस्ते श्री.काकर यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,अध्यात्मिक,धार्मिक कला,क्रिडा,साहित्य,क्षेत्रासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी नाना डोंगरे,मंदाताई डोंगरे,शब्दगंध साहित्यिक मंचच्या राज्य उपाध्यक्ष प्रा.गुंफाताई कोकाटे,तालुकाध्यक्ष मीराबक्ष बागबान,सल्लागार डॉ. शैलेश भणगे,डॉ.सलीम शेख,कवी आनंदा साळवे,तथा इतर साहित्यिक,कवी,लेखक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, अॅड, मोहसिन शेख, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे विजय नगरकर, माणिकराव जाधव, एकलव्य सेवा संघाचे भाऊराव माळी,मेजर कृष्णा सरदार, महाराष्ट्र वडार सेवा संघाचे रमेश जेठे (सर), रेड क्रॉस सोसायटीचे सुनील साळवे (सर) ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे हाजी फयाजभाई बागवान,अत्तार समाज सेवा संघाचे अजिज अत्तार,मेमन समाज सेवा संघाचे अफजल मेमन आदींनी अभिनंदन केले आहे.

टीम झुंजार