
एरंडोल (निपाणे ) : – हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात पाच जनावरे ठार झाली. ही घटना जवखेडेसीम ता. एरंडोल येथे सोमवारी रात्री घडली. जवखेडेसिम येथील शेतकरी संजय कैलास पाटील यांच्या मालकीची ही जनावरे होती.
पाटील यांची गावालगत शेती आहे. शेतात बैल जोडी, गायी , वासरे यांच्यासह १० ते १२ पाळीव जनावरे आहेत. पाटील हे मंगळवारी सकाळी गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लागलीच शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांना हकिकत कळवली.
वासुदेव पाटील यांनी वनविभागाला कळवले. वनरक्षक विजय माळी, वनमजूर रविंद्र पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नागने ( आडगाव ) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शेतकरी पाटील यांचे लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





