VIDEO : धक्कादायक! अफगाणिस्तान मध्ये शाळेत मोठा हल्ला ; 100 हून अधिक मुलांचा मृत्यू , मुलांचे हात-पाय गोळा करून त्यांची ओळख पटवली जात आहे.

Spread the love

अफगाणिस्तानची  राजधानी काबूल  येथील एका शाळेत मोठा स्फोट  झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 100 मुलांचा मृत्यू  झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील पत्रकार बिलाल सावरी यांनी एका शिक्षकाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. घटना इतकी भीषण आहे की, मुलांचे हात-पाय गोळा करून त्यांची ओळख पटवली जात आहे. 

पहा व्हिडिओ :

हा हल्ला किती भीषण होता, याचा अंदाज बिलाल सावरी यांनी केलेल्या ट्विटवरून लावता येईल. त्यांनी शाळेतील एका शिक्षकाच्या हवाल्याने सांगितले की, आतापर्यंत 100 मुलांचे मृतदेह मोजण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असू शकते. या हल्ल्यात शाळेचे मोठे नुकसान झाले असून, शाळेत मृतदेहांचा ढीग लागला आहे. विशेष म्हणजे, तालिबानने येथील माध्यमांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले आहे. तालिबानने रुग्णालयांनाही हल्ल्याशी संबंधित माहिती मीडियाला देऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्याची माहितीही बिलाल यांनी दिली..

काबूल पोलिस प्रमुखांचे तालिबान-नियुक्त प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी दश्ती बर्ची भागातील एका शाळेत हा स्फोट झाला आहे. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. काज हायर एज्युकेशनल सेंटर, असे या शाळेचे नाव आहे. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. 

हे वाचलंत का ?

टीम झुंजार