मुलाचा मुका घेत खर्चासाठी पैसे दिले आणि वडिलांनी आयुष्य संपवलं, काळीज पिळवटणारा पत्नीचा हंबरडा.

Spread the love

जळगाव : – सध्या देशात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव शहरातील अयोध्यानगर येथे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली आहे. भागवत शामराव जाधव (वय ४८ वर्ष, रा. गणपती मंदिराजवळ, अयोध्यानगर) असे मयताचे नाव आहे. घरात सर्वांना कळेल म्हणून भागवत जाधव यांनी बाहेर जाऊन सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर घरी आल्यावर कुणाला कळू दिले नाही, की त्याच्या मनात काय सुरु आहे, मुलाचा मुका घेतला, त्याला खर्चासाठी पैसेही दिले. तो बाहेर गेल्यानंतर भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये ज्या तिघांनी फसवणूक केल्याचा उल्लेख आहे, त्याच तिघांच्या दबावाला कंटाळून भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयत भागवत जाधव यांच्या मुलांनी केला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत शामराव जाधव (वय-४८) रा. गणपती मंदीराजवळ, अयोध्यानगर, जळगाव हे आपल्या पत्नी सुनीता, तेजस व योगेश या दोन मुलासंह वास्तव्याला होते. त्यांचे अजिंठा चौक येथे भागवत ट्रान्सपोर्ट नावाने ट्रकच्या माध्यमातून सामानांची ने-आण करत होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता भागवत जाधव यांच्या पत्नी सुनिता बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले कॉलेजला गेले. अर्ज भरायचा असल्याने तेजस घरी आला. या दरम्यान भागवत जाधव हे बाहेर गेले व काळी वेळातच परत आले. त्यांनी तेजसचा मुका घेतला, त्याला अर्ज भरण्यासाठी आवश्यक पैसेही दिले. त्यानंतर ते घरात गेले, तर तेजस अर्ज भरायला निघून गेला. त्यानंतर घरी एकट्या असलेल्या भागवत जाधव यांनी घराची दोन्ही दरवाजे बंद करुन घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुपारी १२.३० वाजता सुनिता ह्या घरी आल्यावर त्यांना पती भागवत जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. सुनिता जाधव यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिकांनी धाव घेत खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले..

आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची चिठ्ठी

भागवत जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील या तीन जणांची नावे लिहिली आहेत. आठ दिवसांपूर्वी दिनेश माने, बापू पाटील व कंपनीचे मालक पाटील यांनी त्यांच्या ट्रकमध्ये सामान भरून कलकत्ता येथे पाठविण्यासाठी सांगितले. परंतु भागवत जाधव यांनी ट्रकमध्ये माल लोड करू नका असे सांगितले. तेव्हा जबरदस्तीने सामान ट्रकमध्ये भरले. याच्या मोबदल्यात ४५ हजार रूपये ॲडव्हान्स देणार होते. परंतु अद्यापपर्यंत कोणतेही पैसे दिले नाही. ट्रकचे फायनान्सचे हप्तेही चुकले, चार पाच दिवसांपासून झोप येत नाही, त्यामुळे आता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे..

पोलिसांच्या आश्वासनानंतर घेतला मृतदेह ताब्यात

दरम्यान, दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील हे गुरूवारी रात्री यांनी वडील भागवत जाधव यांना बोलावून धक्काबुक्की केली होती. तिघांच्या दबावातून वडिलांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मयत भागवत जाधव यांची मुले योगेश, तेजस यांनी बोलताना केला आहे. तिघांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी अर्ज द्या, चौकशी करुन गुन्हा दाखल करु, असे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार