नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांनी एक जबरदस्त भेट दिली आहे. देशात आजपासून ५जी नेटवर्क मिळणार आहे. पीएम मोदी यांच्या हस्ते आज ५जी सर्विस लाँच करण्यात आली आहे. जाणून घ्या आधीच्या आणि आताच्या स्पीडमध्ये किती फरक आहे. 5G Service Launch in India: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IMC 2022 म्हणजेच मोबाइल काँग्रेस मध्ये आज ५जी सर्विस लाँच केली आहे.

यशस्वीपणे ५जी ट्रायल्स पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकारकडून रिलायन्स जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया या सारख्या टेलिकॉम कंपन्यांना 5G Spectrum चे वाटप करण्यात आले. आज देशात खऱ्या अर्थाने ५जी नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. ५जी सर्विस आल्यानंतर आता जबरदस्त 5G Network सोबत cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये जबरदस्त वेग पाहायला मिळणार आहे. ५जी सर्विसनंतर आता यूजर्संना इंटरनेटची स्पीड रॉकेटप्रमाणे मिळू शकणार आहे.
किती असेल 5 जी स्पीड
५जी वरून लोकांमध्ये खूप उत्सूकता आहे. याची स्पीड पाहण्यासाठी व ती अनुभवण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. सध्या ४जी ची टॉप स्पीड 100mbps म्हणजेच १०० मेगाबिट्स प्रति सेकंद आहे. तर ५जी मध्ये ही स्पीड थेट 10gbps म्हणजेच १० जीबी प्रति सेकंद मिळणार आहे. याचाच अर्थ ४जीच्या तुलनेत ५जी ची स्पीड १०० पट जास्त असणार आहे. ३जी नेटवर्क वर ही स्पीड 7.2mbps होती. देशातील १३ प्रमुख शहरात सर्वात आधी ५जी नेटवर्क मिळणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात ५जी नेटवर्क उपलब्ध करण्यात येणार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






