काजू खाल्ल्याने होतील अनेक जबरदस्त फायदे, पण…

Spread the love

Health benefits cashew nuts: काजू एक स्वादिष्ट पदार्थ म्हणून अनेक जण त्याचा आस्वाद घेतात. पण ते हे विसरतात की काजू खाणे हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतं. योग्य प्रमाणात काजू खाल्ल्यास ते खूप आरोग्यदायी ठरु शकतं.

थोडं पण कामाचं

  • काजूू खाल्ल्याने तुमच्या शरीरातील एस्ट्रोजन
  • राहते संतुलितमहिलांसाठी काजू ठरू खूप फायदेशीर शकतात अनेकदा बदाम, अक्रोड हेच पौष्टिक पदार्थ मानले जातात, पण काजू देखील आहेत फायदेशीर

Health benefits cashew: जेव्हा आपण पौष्टिक पदार्थांबाबत त्यातही सुका मेव्याचा (Dry Fruits) विचार करतो तेव्हा आपण फक्त बदाम, अक्रोड किंवा ब्राझील नट्सचा विचार करतो, लोकांना असे वाटते की काजू (cashew) हा काही आरोग्यदायी पर्याय नाही. लोकांचा असा समज आहे की, काजू हे फक्त जिभेचे चोलले पुरविण्यासाठीच खाल्ले जातात आणि त्याच बरोबर त्यातील चरबीमुळे आपलं वजन देखील वाढतं. (tremendous benefits can be achieved by eating cashew nuts but keep some things in mind)

पण, काजू हा अनहेल्दी पदार्थ नाही. तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. पॉलिफेनॉल, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्समुळे काजू हे सर्व सर्वात आरोग्यदायी आहे. त्यामुळे काजू हे फक्त चव म्हणून खाण्याऐवजी तो एक पौष्टिक पदार्थ म्हणून खावा.

फॅट असूनही काजू पौष्टिक कसं?

काजूमध्ये बरंच फॅट असतं ज्यामुळे हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका देखील वाढतो. खरं तर, काजूमधील बहुतेक फॅट हे स्टीयरिक अ‍ॅसिडपासून तयार होतं. ज्याचा रक्तातील कोलेस्टेरॉलवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे, अनेक अहवालांनुसार, दिवसातून काही काजू खाल्ल्याने लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कमी होऊ शकते.

महिलांसाठी काजू जास्त फायदेशीर

काजू विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहेत. कारण काजूमध्ये असलेले एस्ट्रोजेन हे महिलांसाठी निरोगी हार्मोन्सची पातळी राखण्यास मदत करू शकते. याशिवाय काजूमध्ये अ‍ॅनाकार्डिक अ‍ॅसिडही असते. जे खाल्ल्याने शरीरावर नैसर्गिक अँटी-एस्ट्रोजेन प्रभाव पडतो.


पण, लक्षात ठेवा की असामान्यपणे उच्च एस्ट्रोजेन पातळीमुळेृ स्त्रियांना गर्भाशयाच्या फायब्रॉयड, पीएमएस, वेदनादायक मासिक पाळी आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या रोगांना बळी पडू शकते. शरीरात एस्ट्रोजेनसारखे कार्य करणार्‍या कृत्रिम रसायनांच्या संपर्कात आल्याने अतिरिक्त एस्ट्रोजेन उत्तेजित होऊ शकते.

एका दिवसात किती काजू खावेत?

मूठभर किंवा सुमारे 20 ग्रॅम काजू खाल्ल्याने शरीराला योग्य अ‍ॅनाकार्डिक अ‍ॅसिड मिळू शकते. एक चतुर्थांश कप काजू हे प्रथिने, चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळविण्यासाठी पुरेसे असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आता आपण बिनधास्त काजू खाऊ शकता.

(टीप: या लेखातील सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. त्याचा अर्थ व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून लावला जाऊ नयेत. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.)

हे वाचलंत का ?

टीम झुंजार