पुणे :- पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्फोटांमुळे हा पूल पूर्णपणे खाली कोसळला नसून तो खिळखिळा झाला . त्यानंतर पोकलेन मशीनद्वारे उर्वरित पूलाचे भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या स्फोटांमुळे पूर्णपणे पूल खाली कोसळलेला नाही. मात्र, ज्या पद्धतीने स्फोट करण्याचे ठरले होते, त्या प्रमाणे स्फोट झालेला आहे. मध्यरात्रीनंतर उलटी गणती करत बरोबर १ वाजता हा स्फोट करण्यात आला. (An old bridge at Chandni Chowk in Pune was demolished by explosives after midnight)
या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले असून या पुलाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले पोलादी स्ट्रक्चर मात्र तसेच आहेत. तसेच ज्या -ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आलेली होती, ती सर्वच्या सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा अशी प्रतिक्रिया देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हा पूल पाडण्याअगोदर पुलाला पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले होते. स्फोटानंतर परिसरात धुरळा उडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. त्यानंतर चांदणी चौकातून कर्मचाऱ्यांना देखील या परिसरातून २०० मीटरच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. त्याच प्रमाणे एखादी दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा देण्यात यावी या दृष्टीनेही सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती.
पहा व्हिडिओ :
पूल ३० वर्षे जुना
हा पूल ३० वर्षे जुना होता. मध्यरात्रीनंतर बरोबर १ वाजता पूल पाडण्यासाठी स्फोट घडविल्यानंतर धुराचे लोट उसळले. मात्र, त्यानंतर ५ मिनिटे वाट पाहण्यात आली. एखाद्या स्फोटकाचा स्फोट व्हायचा राहिला आहे का, याबाबत खातरजमा करण्यात आली. त्यानंतर अधिकारी पुलाची पाहणी करण्यासाठी पुढे सरसावले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






