चाळीसगाव :- बारा वर्षानंतर वरिष्ठ श्रेणी व चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी मिळणे हा शिक्षकांचा हक्क असून सदर हक्क डावलणे चुकीचे आहे. परंतु काही शिक्षण संस्था अंतर्गत राजकारणामुळे लाभार्थी शिक्षकांना सदर हक्कापासून वंचित ठेवतात. ठराव दिला जात नाही. मागील गोपनीय अहवाल समाधानकारक नसल्याची कारणे दिली जातात किंवा काही वेळेस कारण नसताना प्रस्तावच पाठविला जात नाही. काही वेळेस शिक्षण विभागातील भ्रष्ट व्यवस्था शिक्षकांच्या प्रस्तावांमध्ये अडथळे निर्माण करते. असे करणे म्हणजे शिक्षकाचा हक्क डावलणे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी चाळीसगाव येथील समता शिक्षक परिषदेच्या तालुका स्तरीय मेळाव्या प्रसंगी केले. दिनांक 1 ऑक्टोबर रोजी शनिवारी चार वाजता सदर मेळाव्याचे आयोजन रावी पतपेढी चाळीसगाव येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप होते.

एससीइआरटी मार्फत जून महिन्यात घेण्यात आलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाद्वारे राज्यात 94500 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. अशा शिक्षकांनी आपण प्रशिक्षण पूर्ण केल्याची नोंद आपल्या सेवा पुस्तकामध्ये करून घ्यावी व वेतनश्रेणी करिता प्रस्ताव दाखल करावेत. शासन निर्णय 20 जुलै 2021 नुसार शिक्षकांनी आपल्या वेतनश्रेणीची पात्रता पडताळून घ्यावी. निवड श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ होण्याची शक्यता असते. सेवा जेष्ठ असलेले व निवड श्रेणीच्या पात्रतेच्या निकषमध्ये बसणाऱ्या शिक्षकांना बऱ्याच वेळा डावलण्याचा प्रयत्न होत असतो. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात सूक्ष्म पद्धतीने पडताळणी केली जात नाही. त्यामुळे लाभार्थी शिक्षक सुटून जातात. त्याकरिता शिक्षकांनी आपल्या हक्काप्रती जागरूक असणे गरजेचे आहे. एससीइआरटी मार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी बाकी असलेल्या शिक्षकांकरिता प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार असून त्या संदर्भात राहिलेल्या शिक्षकांनी अचूक पद्धतीने आपली नोंदणी करून घ्यावी. त्या संदर्भात जागरूक रहावे, अश्या अनेक मुद्द्यांची मांडणी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य तज्ञ मार्गदर्शक प्रा. भरत शिरसाठ यांनी आपल्या 1 तासाच्या अभ्यासपुर्ण व्याख्यानात केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, तात्यासाहेब जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्री माता फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाकरिता संघटनेचे प्रदेश सचिव शामकुमार जाधव, खानदेश विभागीय अध्यक्ष बी. एन. पाटील, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा छाया सोनवणे, उपक्रम विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज नन्नवरे, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रदीप सुरवाडकर, जिल्हा उपाध्यक्षा सरिता वासवानी, जिल्हा उपाध्यक्ष हेमेंद्र सपकाळे, जिल्हा सचिव वर्षा अहिरराव, सहसचिव भारती ठाकरे, कास्ट्राईबचे विभागीय अध्यक्ष प्रभाकर पारवे, माध्यमिक पतपेढीचे संचालक मनोहर सूर्यवंशी, ग. स. सोसायटीचे नवनियुक्त संचालक अजय देशमुख, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन व जिल्हाभरातील अनेक मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. प्रवीण मोरे व श्रावण महाजन यांची जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली. प्रा. राहुल केदार यांची समता शिक्षक परिषद उच्च माध्यमिक विभाग जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली. याप्रसंगी चाळीसगाव तालुका समता शिक्षक परिषद माध्यमिक विभाग कार्यकारिणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली….
- तालुका अध्यक्ष– मिलिंद जावळे
- शहराध्यक्ष– दिनेश जगताप
- उपाध्यक्ष- विनोद सुकदेव सपकाळे
- सचिव- मिलिंद भालेराव
- सहसचिव- मधुकर जावळे
- कोषाध्यक्ष- जनार्दन सानप
- सहकोषाध्यक्ष- अफसर खाटीक
- संघटक- सुशील सोनवणे, हेमंत देवरे ए बी पाटील, वाय.टी.पाटील, दिनेश पगार, सुजीतकुमार सोनवणे, भैय्यासाहेब सूर्यवंशी, संदीप भगत, सतीश रोकडे, सुनील परदेशी, जयेश पवार, सुनील पाटील, किशोर भामरे
- सल्लागार- प्रकाश जाधव, गोविंद बोरसे
नूतन कार्यकारीणीचे मान्यवरांमार्फत नियुक्तीपत्र व पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा छाया सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन चाळीसगाव तालुका निमंत्रक प्रवीण मोरे यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






