पुणे :- सध्या सोशल मीडिया वर रोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफार्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या गोरखपूर एक्सप्रेसवर चढून चालत निघालेल्या तरुणाने रेल्वेची ओव्हरहेड वायर पकडल्यामुळे स्फोट होऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. वीजेचा जोरात धक्का लागल्यानंतर तरुण उडून प्लॅटफार्मवर पडल्यानंतर त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की दुसरं काही कारण हे स्पष्ट झालेलं नाही.
गोवर्धन मल्ला (वय ३३, रा. कटक, ओरिसा) असं या तरुणाचं नाव आहे मल्ला हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो कामासाठी निमित्ताने पुण्यात आला होता. तो खेड परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्याकडे विशाखापट्टणम गाडीचे तिकीट सापडले आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
पहा व्हिडिओ :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया कॉलेजजवळील सिग्नल येथे गोरखपूर एक्सप्रेस थांबली असताना मल्ल हा रेल्वे गाडीवर चढला. तो रेल्वे गाडीवरून चालत आला. गोरखपूर एक्सप्रेस ही पुणे स्टेशन प्लॅटफार्म क्रमांक एक येथे आल्यानंतर तो रेल्वेवरून चालत होता. त्यावेळी पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तारेला हात लावताच मोठा स्फोट झाला. तो उडून प्लॅटफार्म क्रमांक एकवर पडला.
त्याला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोवर्धन हा पूर्णपणे भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना त्याच्या खिशात विशाखापट्टणम गाडीचे तिकीट सापडले आहे. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला किंवा दुसरे काही कारण आहे हे समजू शकलेले नाही. त्याचे नातेवाईक आल्यानंतर या घटनेचा उलगडा होऊ शकतो, असं लोहमार्ग पोलिसांनी सांगितले
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






