झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) सत्य व अहिंसेचे पुजारी सत्याग्रह व असहकार या व्रतांचा अंगीकार करून भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करणारे आपले सर्वांचे लाडके बापूजी म्हणजेच भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसेच भारतरत्न देशाचे दुसरे पंतप्रधान महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झालेले स्वातंत्र्य सेनानी म्हणजेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तरित्या विद्यालयात विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.


विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वच्छतेचे संदेश वालचंदनगर वासियांना दिला. विद्यार्थ्यांनी शालेय परिसर, एसटी स्टँड व पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत घर, वस्ती व गाव स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य कुंभार सर यांनी महात्मा गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले.

वनसाळे याने भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरज मोरे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, पर्यवेक्षक माणिक पिसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






