भडगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुणीची छेड काढल्या प्रकरणी वडगांव बु. येथील तरुणावर भडगांव पोलिस स्टेशन छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एका गावातील १८वर्षीय तरुणी तिच्या रहात्या घराच्या ओट्यावर झाडु मारित असतांना सशंयित आरोपी जितेंद्र सुधाकर मोरे रा. वडगांव सतीचे ता.भडगांव
याने सदर तरुणीचा हात धरून म्हणाला की तु मला खुप आवडते मी तुला लाईक करतो असे म्हणुन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून दि. ३०/ ९/ २०२२ रोजी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ अनिकेत व चुलत भाऊ रविंद्र वाघ यांनी आरोपीस असे का केले याचा जाब विचारल्याचा राग आल्याने फिर्यादीचा भाऊ अनिकेत याला चापटा बुकक्यांनी मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली
म्हणुन फिर्यादी वय १८ वर्ष हिच्या फिर्यादीवरून सशंयित आरोपी जितेंद्र सुधाकर मोरे रा. वडगांव सतिचे याच्या विरोधात भडगांव पो.स्टे भादवी कलम ३५४,३५४(ड) ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार कैलास गिते हे करीत आहे.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






