कर्नाटकच्या शिवमोगामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोब्रा सापाच्या सुटकेनंतर त्याला किस करणं सर्पमित्राला चांगलंच महागात पडलं. सापानं तरुणाच्या ओठांना दंश केला. यानंतर तरुणाची प्रकृती बिघडली. त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
शिवमोगा: कर्नाटकच्या शिवमोगामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोब्रा सापाच्या सुटकेनंतर त्याला किस करणं सर्पमित्राला चांगलंच महागात पडलं. सापानं तरुणाच्या ओठांना दंश केला. यानंतर तरुणाची प्रकृती बिघडली. त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
ऍलेक्स आणि रॉनी नावाचे दोन तरुण नागरी वस्तीतून सापांची सुटका करतात आणि त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडतात. एका लग्न घरात दोन कोब्रा आढळून आल्याची माहिती त्यांना मिळाली. दोन्ही तरुण त्या घरी पोहोचले आणि त्यांनी सापांची सुटका केली
पहा व्हिडिओ :
सापांची सुटका केल्यानंतर ऍलेक्स गंमत म्हणून कोब्रा सापासोबत खेळू लागला. तो कोब्राचं चुंबन घेऊ लागला. तितक्यात सापानं त्याच्या ओठांना दंश केला. जखमी झालेल्या ऍलेक्सला त्वरित मॅकगन रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. योग्यवेळी उपचार मिळाल्यानं तरुणाचा जीव वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कोब्रा सापाचा दंश, तरुणाचा मृत्य
छत्तीसगढच्या कोरबामध्ये काही दिवसांपूर्वीच कोब्रा दंशानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सापानं दंश केल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी तंत्रमंत्र करण्यात आले. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. रिंगनिया गावात हा प्रकार घडला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






