उस्मानाबाद : – ( कळंब ) ‘तुमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक वाटत आहे,’ असे नमूद करत कळंब आगारातील दोघा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यात एका महिला वाहकाचा तर एका वाहतूक नियंत्रकाचा समावेश आहे.

सध्या एका महिला कंडक्टरला कामावरून निलंबित करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऑन ड्युटी रील्स बनवल्याने तिला कामावरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचं सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.
कर्तव्यावर असताना रिल्स बनवणे टिक टॉक स्टारला चांगलेच महागात पडले आहे. एसटी महामंडळात लेडी कंटक्टर असलेल्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत महिला कंडक्टरवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये या महिला कर्मचारी कार्यरत होत्या. त्या इंस्टाग्राम रील्स बनवून शेअर करत होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियात प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. त्या महामंडळाच्या गणवेशावर व्हिडिओ शूट करत असून महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांचा व्हिडिओ शूट करणाऱ्या सहकाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, अनेकदा कर्मचारी ऑन ड्युटी रील्स शूट करून व्हायरल करत असतात. त्यामुळे कधीकधी ते ट्रोल होतात तर कधीकधी त्यांना सपोर्ट केला जातो. तर या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केल्यावर अनेक जणांनी संताप व्यक्त करत महामंडळाला धारेवर धरले आहे.
गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी डान्स केल्यामुळे अनेक लोकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. तर त्यांना पम जीव आहे, त्यांनी पोलिसांच्या गणवेशात नाचलं म्हणून काय झालं असं म्हणत अनेकांनी त्यांच्या बाजूने आपले मत मांडले होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






