झुंजार । प्रतिनिधी एरंडोल-शहरात नगरपालिकेने ठिकठीकाणी बसविलेल्या सीसीटीव्हिंमुळे वाढत्या गुन्हेगारीस आळा बसून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.नगरपालिकेतर्फे शहरातील सुमारे पंचवीस ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव अध्यक्षस्थानी होते.भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,बाजार समितीचे माजी सभापती स्व्हालीग्राम गायकवाड प्रमुख पाहुणे होते.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते सीसीटीव्हीचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे आणि पालिकेने केलेल्या कार्याचा गौरव केला.शहरात सीसीटीव्ही बसविण्याची अनेक दिवसांपासून असलेली मागणी नगरपालिकेने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट होईल असा विश्वास व्यक्त केला.गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यास सीसीटीव्हींची मदत होणार असल्याचे सांगितले.

नगरपालिकेतर्फे शहरात विविध लोकाभिमुख उपक्रम राबले जात असल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या कार्याचा गौरव केला.भाजपचे अँड.किशोर काळकर यांनी शहरात सीसीटीव्ही हि काळाची गरज असल्याचे सांगितले. सीसीटीव्हीमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करतांना मदत होऊन ख-या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात मदत होईल असे सांगितले.उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी विविध शहरांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आले असल्याचे सांगितले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी सीसीटीव्हीची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना दिली.दरम्यान शहरात बस स्थानक,कासोदा नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बुधवार दरवाजा, शिवाजी महाराज पुतळा,महात्मा फुले पुतळा,भगवा चौक,पीर बाखारूम बाबा,पांडववाडा,राममंदिर,म्हसावद नाका, आय.लव्ह एरंडोल चौक (केवडीपुरा),बीएसएनएल कार्यालय,चुनाभट्टी,बरकनदास मस्जिद,जयहिंद चौक, बडी मस्जिद,कासोदा दरवाजा या पंचवीस ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

शहरातील सर्व नवीन वसाहती,धरणगाव चौफुली यासह राहिलेल्या सर्व भागात लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.कार्यक्रमास माजी नगरसेवक जहिरोद्दिन शेख कासम,अभिजित पाटील,योगेश महाजन,बबलू चौधरी,डॉ.सुरेश पाटील,चिंतामण पाटील,असलम पिंजारी,नितीन महाजन,पारोळा बाजार समितीचे संचालक विजय पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी नगरपालिका आणि पोलीस कर्मचा-यांनी सहकार्य केले.

चौकट-कार्यक्रमात पालिकेचे प्रशासक विकास नवाळे यांच्या कार्याचा सर्वच मान्यवरांनी गौरव केला. मुख्याधिकारी नवाळे यांचे नाव विकास असल्यामुळे त्यांची भूमिका नेहमी विकासाची असून दूरदृष्टी ठेवून शहरात विकासकामे करीत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरण,स्वच्छता,स्मशानभूमी,आठवडे बाजार, वसुंधरा पार्क व वसुंधरा चौक यासारख्या विविध कामांचे दाखले देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






