प्रतिनिधी कासोदा… येथील वार्ड न. एक मधिल कायम रहिवाशी पुष्पा अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे लेखी निवेदन दिले आहे की वार्ड नंबर १ मधे अमृत डेअरी जवळ गावठाण जागा असून त्या ठिकाणी गल्लीचे सांडपाणी तसेच पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते तसेच त्या ठिकाणी कुठलाही रस्ता किंवा वापर हा कायदेशीर नसून त्या जागेवर गुरांचे व डुकरांचे आणि शेतकऱ्यांचे अवजड वाहने उभी केली जातात. या ठिकाणी नेहमी घाणीचे साम्राज्य असते त्याकडे ग्रामपंचायत देखील त्या भागाची कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही मी त्या जागेची घरकुल बांधकामासाठी मी दिनांक २४ मार्च २०२१ ला सर्व माहितीसह ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केलेला होता.
सदरील अर्ज ग्रामसेवक के. डी. मोरे यांनी ग्रामसभेत ठेवला नाही म्हणून मी लेखी उत्तर मागितले त्यांनी उत्तर म्हणून सर्वस्वी जबाबदारीची नोटीस पाठवली ती मी स्वीकारली नाही . मला न्याय द्यावा म्हणून मी सदर निवेदन सादर करत आहे. आता मला घरकुल बांधकामासाठी जागा द्या व त्या परिसरातील घाणीचे साम्राज्य दूर करा असा अर्ज दाखल केलेला आहे. त्या जागेच्या शेजारी बौद्ध समाजाचे समाज मंदिर असून त्यास पूर्व-पश्चिम असा वापर आहे. एकाच घरातील व्यक्तीचे समाज मंदिराजवळ तीन घरे बांधलेले आहेत.
सदर वार्डात ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या व्यवस्था केलेल्या आहेत. मला बांधकाम करण्यासाठी अडचणीत टाकले आहे म्हणून सदरील वार्डची चौकशी होऊन लोकशाही दिनी दाखल तक्रारीस योग्य न्याय मिळावा न्याय न मिळाल्यास २५ जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळ उपोषणास बसण्याचा इशारा देखील सदर निवेदनात दिलेला आहे.
या भागात किंवा गावठाण जगेवर तसेच सार्वजनिक शाळेच्या पुढील व मागील रहिवाशांना दोन दोन वेळा लाभ देण्यात येत आहे या लोकांना जेवढे घरकुल जेवढे असते त्यापेक्षा चार पटीने बांधकाम करून दिले जाते. असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती पालक मंत्री जळगाव, एसपी साहेब जळगाव पोलीस स्टेशन कासोदा प्रांताधिकारी एरंडोल, तहसीलदार एरंडोल , गट विकास अधिकारी एरंडोल व ग्रामपंचायत कार्यालय कासोदा यांना निवेदन देण्यात आलेले आहे