शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; २ खासदार, ५ आमदार करणार सीमोल्लंघन !

Spread the love

दसरा मेळावा : मुंबईत आज होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवाजीपार्कवर होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा हा बीकेसीतील मैदानावर होत आहे. आजच्या दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना जोरदार झटका देणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याचं कारण आहे शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी केलेलं वक्तव्य.

मुंबई :- ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शिंदे गटांच्या आजच्या दसरा मेळाव्याने ( Dasara Melava News ) राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे समर्थक आणि शिंदे गटाचे समर्थक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी राज्यातून रवाना होत आहे. शेकडोंच्या संख्ये शिंदे गटाचे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक मुंबईत येत आहे. आजच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे असं काय करणार? याची उत्सुकता लागली होती. आता शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी गौप्यस्फोट केला आहे. दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

मुंबईत शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आज होणार आहे. तर मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची पूर्ण तयारी झाल्याचं बोललं जातंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात ( Shinde Faction Mlas ) प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने ( Krupal Tumane ) यांनी केला आहे. कृपाल तुमाने हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी कृपाल तुमाने हा दावा केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हे खासदार आणि आमदार प्रवेश करणार आहेत.

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार हा मुंबईचा असू शकतो. तर दुसरा खासदार हा मराठवाड्यातील असू शकतो, असा मोठा दावा तुमाने यांनी केला आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्या वक्तव्यानंतर हे खासदार आणि आमदार कोण आहेत, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार