मुंबई – देशात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच आज पहाटे मुंबईतीलवांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघाताची थरकाप उडवणारी दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या वेळी वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्सची भीषण टक्कर झाली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. १२ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा थरारक घटनाक्रम कैद झालाय. 2.53 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. वांद्रे वरळी सी लिंकवर दोन वाहनांचा आधीच अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उभी असल्याचं दिसून आलंय. त्या रुग्णवाहिकेमागे अन्य दोन वाहनंही उभी होती. तर पुढे आणखी एक कार होती.
इतक्यात एक कार भरधाव वेगाने येते. वांद्रे वरळी सी लिंकवर अपघातग्रस्त वाहनांच्या लेनमध्येच ही कार थेट घुसते आणि जोरात आदळते. ही धडक इतकी भीषण होती की चारही वाहनं एकमेकांमध्ये घुसली. एका अपघातातून वाचलेल्या रुग्णांना मृत्यूने पुन्हा एकदा गाठल्याची दुर्दैवी घटना दसऱ्याच्या दिवशी पहाटे घडली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






