जामनेर,(प्रतिनिधी) : – सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जामनेर तालुक्यात एक घटना घडली आहे. तुला व तुझ्या आईला मारून जंगलात फेकून देण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामनेर येथे उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपी नन्ना नजाकत खान, रा. गलाटी नाला फुकटपुरा, जामनेर याच्या विरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी गुरन ४४६ / २०२२ भादवी ३७६ (२)(J) (२) (N) सह बालकांचे लैगीक अपराधापासुन संरक्षण अधी २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे जामनेर पोलीस
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार हकिकत अशी की, दि.२०/०७/ २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता सुमारास आरोपी याने फिर्यादी ही घरी नसतांना फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादीची मुलगी हिला लाकुड वेचण्याचे बहाण्याने बोदवड रोडवरील बहिरे बुवा जंगलात घेवुन जावुन तीला तुला मारुन टाकेल व तुझा आईला पण मारुन जंगलात फेकुन देईल अशी धमकी देवुन पिडीत सोबत जबरीने शाररीक संबंध केले आहे तसेच फिर्यादी ही घरी नसल्याचा फायदा घेवुन वारंवार वेळोवेळी पिडीत हिचे सोबत जबरीने शारिरीक संबध केले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिलीप दादाराव राठोड नेम, जामनेर हे करित आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






