नवी मुंबई : – महापेतील कंपनीच्या परिसरात मानवी कवटी आढळली आहे. महापेतील एमआयडीसीमध्ये मानवी कवटी सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे. कंपनी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक कुत्रा दिसून आला आहे. त्या कुत्र्याच्या तोंडात मानवी कवटी आहे. या प्रकरणाचा तपास रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवटी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ती नेमक्या कोणत्या व्यक्तीची आहे ते समजू शकलेलं नाही. कुत्र्यानं ती कवटी जवळपासच्या स्मशानभूमीतून किंवा दफनभूमीतून आणली असावी, अशी शक्यता पोलिसांनी बोलावून दाखवली.
कवटी दिसून आल्यावर आम्ही कंपनीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं फुटेज तपासलं. कुत्र्यानं ती कवटी तोंडात धरल्याचं फुटेज तीन दिवसांपूर्वीचं आहे. या परिसरात एखादा मृतदेह टाकण्यात आला आहे की कुत्र्यानं ती कवटी एखाद्या स्मशानभूमीतून आणली याचा शोध आम्ही घेत आहोत, अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली. पोलिसांनी कवटी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






