पाचोरा – येथील प्रा.शिवाजी भास्कर शिंदे यांना “महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र” तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार-2022” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात दिनांक 30 रोजी जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण दशरथ महाजन (चाळीसगाव) व जिल्हा सचिव प्रवीण काकाजी मोरे (चाळीसगाव) यांच्या शिफारशीनुसार प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.
प्रा शिवाजी शिंदे हे 28 वर्षापासून अध्यापन सेवेत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे ते सेवारत आहेत. येथील गिरणाई शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी असलेले शिवाजी शिंदे यांनी युवक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. राज्य , जिल्हा व तालुका स्तरावर विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.
पत्रकार, लेखक, कवी, निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय जनगणना कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. यापूर्वीही त्यांना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेड, शिक्षक आमदार अपूर्व हिरे, रोटरी क्लब ऑफ पाचोरा, तसेच रोटरी क्लब चाळीसगाव, समाज प्रबोधन संस्था नाशिक, दर्जी फाउंडेशन, अशा विविध संस्था संघटना तर्फे पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
2018 च्या नगरपालिकेचे स्वच्छता विषयक ब्रँड अँबेसेडर व सतत तीन वर्ष पाचोरा लोकन्यायालयाचे पंचन्यायाधीश म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिवाजी शिंदे यांच्या स्तुत्य निवडीबद्दल त्यांचे जिल्हा भरातून कौतुक होत आहे
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन