जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अवैध रीत्या हत्यार बाळगून दहशत निर्माण करण्याच्या सघ्या वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव शहरातील मध्यवर्ती नवी पेठ सेंट्रल बँकेसमोर कंबरेला लोडेड पिस्तुलासह कुकरी लावून दहशत माजविणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्या ऐन सायंकाळी त्याच्या ताब्यातून शस्त्र जप्त करून गुन्हा दाखल झाला आहे.शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठ भागात संशयित शस्त्र घेऊन दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली.
गस्तीपथकासह त्यांनी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, रतन गिते, ज्ञानेश्वर उन्हाळे यांच्या पथकाला नवी पेठ बँक स्ट्रीटवर रवाना केले. वर्णनानुसार संशयित निखिल सुरेश पाटील (वय ३५, रा. खोटेनगर) याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला लोडेड पिस्तुलासह धारदार कुकरी मिळून आली. संशयिताला अटक केल्यावर त्याने इतर गुन्ह्यांची माहिती दिली असून, त्याने गणेश कॉलनीत मोठी घरफोडी केल्याचे व इतर गुन्ह्यांत तो सहभागी असल्याचे समोर आले.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






