जळगाव : – सध्या महाराष्ट्रात बाइक वरून चैन चोरी होण्याचया घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव शहरात सामान्य माणसासोबत चोरी असो की इतर गुन्ह्यांच्या घटना या घडतच असतात. मात्र, जेव्हा अशी कुठली घटना पोलीस कर्मचाऱ्यासोबतच घडत असेल तर आश्चर्य व्यक्त केले जाते. अशीच एक घटना जळगावात घडली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर शतपावली करत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी महिलेसोबत असं काही घडलं की वाचून विश्वास बसणार नाही.
महिला शतपावली करत असताना एका इसमाने चाकूने जखमी करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पोलीस सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचे काय असा प्रश्न उपस्थित होत असून चोरट्यांनी पोलीस मैदानावर ते पण महिला महिला पोलिसाची पोत लांबवून एकप्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयातील सोसायटीत आरती मोतीलाल कुमावत (वय-३२) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्या जिल्हाापेठ पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी म्हणून नोकरीला आहे. गुरुवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या.
चोरट्याने पाठलाग करत रस्ता अडविला अन् नंतर….
एक चोरटा तोंडाला काळा रूमाल बांधून त्यांच्या मागावर आला. त्याला पाहून आरती कुमावत या पळत सुटल्या. चोरट्याने त्यांचा पाठलाग करून त्यांचा रस्ता अडविला. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत होता. त्यावेळी महिलेने त्यांच्या तोंडावरील रूमाल ओढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोरट्याने हातात चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरी हिसकावून त्यांना जखमी करत पसार झाला. घटनेनंतर धास्तावलेल्या आरती कुमावत यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.