प्रतिनिधी । एरंडोलएरंडोल :- येथे आदिवासी समाजावर बहिष्कार टाकणाऱ्यावर सामाजिक बहिष्कार कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याबाबत एकलव्य संघटना, एकलव्य संघटना अपंग सेल जळगाव यांच्या वतीने नायब तहसीलदार एस पी शिरसाठ व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना निवेदन देण्यात आले. एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या आदेशानुसार एकलव्य संघटना एकलव्य संघटना अपंग सेल जळगाव जिल्हाध्यक्ष .ऋषी सोनवणे.जळगाव जिल्हा संघटक पिंटू सोनवणे. एरंडोल तालुका अध्यक्ष. वाल्मिक सोनवणे एरंडोल तालुका युवा अध्यक्ष. जय मोरे .सोशल मीडिया प्रमुख .गणेश मोरे एरंडोल तालुका युवा टायगर फोर्स अध्यक्ष. विनोद मालचे. टायगर फोर्स उपाध्यक्ष .प्रवीण पवार. समाज कार्यकर्ते. भिवसेन बाबा सोनवणे. कासोदा आडगाव गटप्रमुख. पंडित पवार. आज जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व नायब तहसीलदार एस पी शिरसाठ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लखमापुर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील आदिवासी समाजावर बहिष्कार टाकणार यांवर सामाजिक बहिष्कार कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याबाबत महोदय वरील विषयान्वये विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की दिनांक 17 /12 /2021रोजी लखमापूर येथे निंदनीय घटना शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली. होती की आदिवासी शेतमजूर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पूर्ण गावातून सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल असे लेखी पत्र काढून व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असताना सर्व मजूर वर्गाला काही संवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडवून तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊ नका गेले तर तुम्हाला गावात राहू देणार नाही व त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबंधित जमावाने मारहाण करून आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांना व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी .पोलीस पाटील. तंटामुक्ती अध्यक्ष. ग्रामसेवक. सरपंच .यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून बहिष्कार अधिनियम 2016 पासून कायद्याअंतर्गत कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत याकरिता शासनाकडून कायद्याची अंमलबजावणी सक्तीने करावी असे निवेदनावर म्हटले आहे या निवेदनावर एकलव्य संघटना व अपंग सेल यांच्या पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.फोटो ओळ :- एरंडोल पोलीस ठाण्यात निवेदन देतांना ऋषी सोनवणे,पिंटू सोनवणे,वाल्मिक सोनवणे व इतर पदाधिकारी
Home ताज्या बातम्या आदिवासी समाजावर बहिष्कार टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून एकलव्य संघटनेतर्फे तहसीलदार...