बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांचा स्मृतिदिन साजरा ..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


लासुर्णे : – ( ता. इंदापूर )
दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी लासुर्णे या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब यांचा सोळावा स्मृतिदिन साजरा करण्यात आला . या
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी माननीय अजितजी ठोकळे साहेब तसेच प्राध्यापक लामतुरे सर जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव माननीय अजित ठोकळे साहेब यांनी सत्ता हातात घेतल्याशिवाय आपल्यावरील अन्याय दूर होणार नाही अन्याय कमजोर लोकांवर होतो सत्ताधाऱ्यांवर अन्याय होताना कधी पाहिला आहे का असा सवाल त्यांनी केला .


पुढे ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय सत्ताही अशी मास्टर चावी आहे कि ती जर हातात घेतली तर सर्व समस्यांची दारे उघडे होतील आणि म्हणूनच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद ,विधानसभा ,लोकसभा या ठिकाणी आपली भूमिका मांडणारे आपले प्रश्न मांडणारे सदस्य हे निवडून गेले पाहिजेत त्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय जनतेसमोर असून त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. मनुवादी व्यवस्थेने ग्रासलेले जे पक्ष जातिवाद पसरवताना आज आपणाला दिसत आहेत त्यांना धडा शिकवून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशी भूमिका मा अजितजी ठोकळे साहेब यांनी मांडली.


प्राध्यापक लामतुरे सर यांनी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकून साहेबांचा त्याग संघर्ष हा देशभरातील वंचित बहुजन समाजासाठी होता आणि त्यांनी या बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य कशा पद्धतीने व्यथित, अर्पण केले हे उपस्थित अनुयांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दाखवली


या कार्यक्रमाचे नियोजन इंदापूर विधानसभा बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व बारामती लोकसभेचे प्रभारी मा. प्रदीप कुमार साबळे, इंदापूर विधानसभा अध्यक्ष संतोषजी सवाने, उपाध्यक्ष मनेश कांबळे ,महासचिव दीपक सावंत ,कोषाध्यक्ष आनंद फडतरे ,डॉ . प्रफुल लोंढे यांनी केले.


या कार्यक्रमाला क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब सावंत सामाजिक कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर रामदास चव्हाण अनिल दनाने, ॲड . संजय चंदनशिवे, रवी जाधव, सुमित मिसाळ ,सिद्धार्थ लोंढे ,साहिल लोंढे ,भागवत लोंढे ,बाळासाहेब लोंढे ,सत्यवान लोंढे ,कैलासजी शिंगाडे ,प्रमोद चव्हाण तसेच इंदापूर विधानसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार