दसऱ्याला पुरणपोळ्या खाल्ल्या नाहीत, आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Spread the love

सेनगाव :- तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत.काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे
दरवर्षी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्य सोबतच कुटुंबातील लहान चिमुकल्यांवर सुद्धा होत आहे.

अनेक बाबींपासून लहान ज्यांना सुविधा त्याचे पाहिजे तसे लाड बळीराजा आपल्या मुलांचे पुरवू शकत कारण त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा आहे. अशाच एका शेतकऱ्याच्या लहानग्याने आपल्या परिवाराच्या वेदना मांडत एक पत्र चक्क मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत.

काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे,असे भावनिक पत्र शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.शेतकऱ्याची आत्महत्या शरद पवारांच्याही जिव्हारी; थेट जुन्नर गाठत कुटुंबियांची भेट घेतली
एका शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील मुलाने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत,अशी खंत व्यक्त केली आहे.

जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता.ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार