झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील युवकांना नवरात्र महोत्सवात गावातील इतर समाजातील लोकांनी अमानुष मारहाण केली असून संबंधीत बावडा पोलीस स्टेशन येथे अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला गेला.

दिनांक 8/10/2022 रोजी घडलेल्या घटनेची पाहणी व चौकशी कामी बावडा बिट पोलीस स्टेशन चे तपास अधिकारी पी.आय श्री पाटील साहेब, पोलीस श्री भोसले साहेब, तसेच श्री विजय (dady)सोनवणे RPI महाराष्ट्र राज्य संघटक व डॉ आंबेडकर युवा प्रतिष्ठान लासुर्णे चे मार्गदर्शक, ऍड मंगेश लोंढे, ऍड अभय जगताप, सोमनाथ भोसले, योगेश चव्हाण, व डॉ .बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान लासुर्णे चे पदाधिकारी यांनी सांत्वन भेट दिली.
सदर घटनेची माहिती घेतली असता पीडित कुटूंबातील जखमी युवक व त्याची समाजातील परिवर्तनाची चळवळ इतर समाजाला खटकत होती व त्याचा राग मनात धरून हा गुन्हा घडला.

झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करत पीडित कुटुंबाला आधार देत तपास अधिकारी तसेच dady सोनवणे व समस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान युवक यांनी तात्काळ आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.
तसेच घटनेतील पीडित यांची इंदापूर येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारा दरम्यान भेट घेतली व डॉ. क्षीरसागर यांना योग्य आणि आवश्यक उपचार होण्यास निवेदन दिले.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तर दुसरी कडे रोज जाती जाती मधील भेदभाव, अनुसूचित जाती जमातीतील समाजावरती होणारे अन्याय, अत्याचार थांबताना दिसत नाहीत, तरी सर्व युवा वर्गाने आपापली अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, आणि सक्षम झालं पाहिजे हेच सर्वात मोठं आव्हाण आहे असे विजय (dady) सोनावणे (RPI महाराष्ट्र राज्य संघटक व मार्गदर्शक डॉ . बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान लासुर्णे) यांनी यावेळी मार्गदर्शन केले.तसेच ह्या गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या वतीने विनामूल्य कामकाज पाहण्याचे आश्वाशन ऍड. मंगेश प्रभाकर लोंढे यांनी दिले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






