अरे बापरे.. नवी कार घरी आणली अन् हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच.

Spread the love

सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.आपण नवी कार घेतल्याचे सर्वांना कळावे असे प्रत्येकालाच वाटते. पण या पद्धतीने कार घरी आल्याचा व्हिडीओ व्हायरल व्हावा असे कधीच वाटले नसेल.

स्वतःची कार विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन पैशांची जुळवाजुळव केली जाते. यानंतर अखेर जेव्हा कार विकत घेतली जाते त्यानंतर ही गोष्ट शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना सर्वांना सांगण्यासाठी आपण उत्सुक असतो. जेव्हा नवीकोरी कार घरी आणली जाते त्यावेळी सर्वांचे लक्ष फक्त कारवरच असावे असे वाटते. असेच काहीसे सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये झालेले पाहायला मिळत आहे. सर्वांचे लक्ष या नव्या कारकडे गेले पण याचे कारण वेगळेच ठरले.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक नवी गाडीचे घरी आणण्यात आल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला ही कार गेटमधून व्यवस्थित आत येते. पण आत येताच कदाचित चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते, त्यामुळे कार थेट पार्क केलेल्या दुचाकी गाड्यांवर आदळते आणि पलटते. ही संपुर्ण घटना तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

पहा व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओला ट्विटरवर ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ‘असे स्वागत कधीच पाहिले नाही’ अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार