पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका तरुणाने विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो काढत फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात २१ वर्षीय पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असल्याचे बघून संशयित आरोपी वैभव चौधरी हा घरात आला व त्याने तोंड दाबले. तू ओरडली तर विचार कर, अशी धमकी देऊन आरोपीने पिडीतेवर अत्याचार केला. त्यावेळी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो देखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पीडितेच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन काढलेले फोटो पाठवले. हे फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना आरोपी वैभव हा पुन्हा एकदा पिडीतेच्या घरात घुसला. परंतू तेवढ्यात पीडितेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आले. पीडितेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पिडीतेच्या पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋषी चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला. त्यानेही पीडितेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. तसेच, सासू सासऱ्यांनादेखील चापटा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितापैकी वैभवला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन