भुसावळ : – सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक अल्पवयीन मुलगीचे फेसबुकवर तरुणासोबत प्रेमाचं सुत जुळले. नंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मुलगी घरी न आल्याने याबाबत मुलीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसानी तिचा शोध घेतला. आणि तिला परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आले. यानंतर मुलीने आपल्या जाबाबात धक्कादायक माहिती दिली. प्रियकराने आणि त्याच्या बापाने 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.
याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवर एका सोबत प्रेमाचं सुत जुळल्याने ती व तीचा प्रियकर दि. २९ सप्टेबर गुरुवार रोजी घरातून पळून गेले होते. ही गोष्ट मात्र बापला माहित नसल्याने वरणगाव पोलीस स्टेशनला मूलगी सकाळी दहा वाजेला सायकलीने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती, संध्यकाळ सहा वाजेपर्यत मूलगी घरी आली नाही म्हणून नातेवाईकांसह शोध घेत असताना तीची सायकल गवतात पडलेली दिसली. मात्र मूलीचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीच्या हरविलेल्या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलीस निरिक्षक आशिष अडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा शोध घेत फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरठी सोमनाथ येथून घेऊन आले होते. दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले होते.
तेथे पिडीत मूलीने आपल्या जबाबात प्रियकराने व त्याच्या बापाने अत्याचार केल्याचे सांगितल्याने वरणगाव पोलीसांनी प्रियकर व मूलीच्या बापाला अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनला याबाबत त्या दोघांविरोधात भादवी कलम ३७६ प्रमाणे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सह उप पो. निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे. त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.