जामनेर प्रतिनिधी अरुण तायडे
जामनेर। प्रतिनिधी:- राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शरद पाटील पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा,,, शंकर राजपूत काँग्रेसचे सक्रिय सभासद नाही शरद पाटील जामनेर प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की जामनेर काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्षपदी श्री शंकर राजपूत यांची दिनांक 6/12021 रोजी मुंबई येथे माननीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी श्री शंकर भाऊ राजपूत यांची जामनेर राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी चे नियुक्ती पत्र देऊन तसे शंकर राजपूत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेआहे
आज रोजी काँग्रेसचे शरद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले आहे यासंदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की शंकर राजपूत यांना तालुकाध्यक्षपदी झाले असेल आपल्याला वरिष्ठ पदाधिकारी यांनी मला कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही व आपणास आज काँग्रेसचे जामनेर तालुका अध्यक्ष आहे राहिल मी काँग्रेसचा सैनिक असून प्रांत अध्यक्ष यांचा मी आदर करतो परंतु मला माझे म्हणणे काँग्रेसच्या नियमाप्रमाणे मांडण्याचीसंधी देण्यात यावी व श्री शंकर राजपूत अजून सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य नाही मी आज सुद्धा तालुकाध्यक्ष आहे व माझे काम मी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या जोमाने करत आहे .
तरी मी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशाची पालन करून जोपर्यंत सन्माननीय जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष मला आदेश देत नाही तोपर्यंत मीच जामनेर तालुका अध्यक्ष आहे असे प्रतिपादन श्री शरदपाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जामनेर तालुक्यात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पदावरून तालुक्यात विषय गाजतआहे त्यामुळे कार्यकर्त्यांना श्रद्धा प्रश्न पडलेला आहे तालुकाध्यक्षपदी कोण हा चर्चेचा विषय आहे