जळगाव : – अनेकवेळा व्हॉट्सअॅपवरून अनोळखी लोकांशी बोलणं किंवा त्यांच्याशी व्हिडिओ कॉल करत गप्पा मारणं किती धोकादायक असतं, याचा प्रत्यय जळगावात आलाय. जळगावातील एकाला अनोळखी महिलेसोबत व्हॉट्सअॅपवरून न्यूड व्हिडिओ कॉलिंग करणं चांगलंच महागात पडलं आहे.
अनोळखी महिलेने न्यूड कॉल व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ लाखांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाला दि. ८ रोजी फेसबुकवर एका मुलीच्या नावाने रिक्वेस्ट आली. संबंधित व्यक्तीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीचा व्हाटसअप (Whatsapp) नंबर घेतला व त्या पुरुषाला एकांतात येवून कपडे काढायला सांगितले. त्या महिलेने व्हिडीओ कॉल करीत तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून घेतला.
यानंतर त्या ४० वर्षीय पुरुषाला २ लाख रुपये मागितले. तसेच पैसे न दिल्यास तूझा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल करेल अशी धमकी देत २ लाखांची मागणी केली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने जळगाव शहरातील सायबर पोलीसात धाव घेत संबधित तरुणीच्या नावाने बनविलेले खाते धारकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लीलाधर कानडे हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






