कपाशी, तूर पिकात केली गांजाची लागवड,सोयगाव पोलिसांच्या छापा, आरोपीस अटक

Spread the love

मराठवाडा संपादक
सोयगाव,
:- चक्क शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रातील कपाशी व तूर पिकांमध्ये गांजाची लागवड केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी चार वाजता जरंडी ता सोयगाव शिवारात सोयगाव पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे.सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी तब्बल तीन तास कारवाई करून ६१किलो ९८० ग्रॅम गांजाची झाडे हस्तगत करून तीन लक्ष दहा हजाराचा मुद्देमाल आरोपीच्या शेतातून हस्तगत केला आहे..सोयगाव पोलिसांची चार वाजेपासून सुरू असलेली कारवाई तब्बल तीन तासांनी आटोपली होती त्यामुळे सोयगाव तालुक्यात पहिल्यांदाच सोयगाव पोलिसांची तीन तास कारवाई झाली आहे.या प्रकरणी शेतात झाडात लपून बसलेल्या आरोपीला सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे.

सोयगाव-बनोटी रस्त्यालगत जरंडी शिवारात गट क्र-२९ मध्ये शेतकरी सुभाष महादू महाजन(वय४५) यांनी कपाशी व तूर लागवड केलेल्या दोन एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत सोयगाव पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी पोलीस पथक सह घटनास्थळी धाव घेऊन जरंडी शिवारातील गट क्र-२९ मधून ६१ किलो ९८० ग्राम वजनाची गांजाची झाडे हस्तगत करून आरोपी सुभाष महादू महाजन यांचे विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनो व्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ कायदा अधिनियम १९८५ अंतर्गत सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी सुभाष महाजन(रा.जरंडी,ता.सोयगाव) यास अटक केली आहे

चौकट

तब्बल नऊ फूट उंचीची गांजाची झाडे–
जरंडी शिवारातील गट क्र-२९ मध्ये छाप्यात सोयगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत चक्क नऊ फूट उंच वाढलेली गांजाची झाडे आढळून आली असून या झाडांना पिवळसर बॉंडे लागून आलेली होते,त्यामुळे ही गांजाची झाडे परिपक्व झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान घटनास्थळी महसूल आणि कृषीच्या अधिकाऱ्यांसह सोयगाव पोलिसांनी शासकीय पंचनामाँ केला आहे.

चौकट२)–सोयगाव-चाळीसगाव रस्त्याला लागून असलेल्या जरंडी शिवारातील आढळलेली गांजाची झाडे नव्हे तर चक्क पेंढ्या आढळून आल्या होत्या शासकीय पंचा समक्ष या पेंढ्याची पोलिसांनी मोजदाद केली असता पहिल्या टप्प्यात ३० किलो ७१० ग्रॅम, दुसऱ्या टप्प्यात १७ किलो ९३० ग्रॅम आणि अंतिम टप्प्यात १२ किलो ९८० ग्रॅम याप्रमाणे ६१ किलो ९८० ग्रॅम गांजाची झाडे हस्तगत केली आहे दरम्यान कारवाई नंतर ही गांजाची झाडांची व पेंढ्याची मोजदाद करण्या साठी सोयगाव पोलिसांना तासभर कालावधी लागला होता.
याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार मराठे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक सतीश पंडित, जमादार राजू मोसम बर्डे,गणेश रोकडे, ज्ञानेश्वर सरताळे, रवींद्र तायडे,अजय कोळी आदी पुढील तपास करत आहे

आरोपीस अटक–
याप्रकरणी आरोपी सुभाष महादू महाजन(रा. जरंडी ता सोयगाव) यास सोयगाव पोलिसांनी कपाशी च्या शेतातून अटक केली आहे.या प्रकरणी पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार