भातखेडा येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काकानी केला पुतण्याच्या पराभव.
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील विखरण,भातखेडे, पिंपळकोठा बु. येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 18 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. व विखरण येथील एका जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. त्या ठिकाणी एका जागेची निवडणूक राहिल्यामुळे मतदान झालेल्या जागेचा निकाल राखीव ठेवण्यात आला. ह्या एका जागेचा व उर्वरित तीन जागा असे चार जागेचा निकाल आज तहसील कार्यालयात घोषित करण्यात आला.
विखरण येथील प्रभाग क्र तीन मध्ये सारिका विजय खैरनार यांना 400 मते मिळून विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक दोन यामध्ये ओंकार कृष्णा पाटील यांना 308 मते मिळून विजय झाले आहेत. या
ठिकाणी विजयी झालेले उमेदवार 8 मतांनी विजयी झाले आहेत तर याठिकाणी नोटाला 12 मते मिळाली आहेत.
भातखेडा येथे रामराव धनराज पाटील यांना 260 मते विजयी झाले आहेत या ठिकाणी त्यांनी आपल्या पुतण्याचा पराभव केला आहे.
पिंपळकोठा बुद्रुक येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत योगिता राहुल पाटील हे विजयी झाले आहेत
या जागेवर मिनाबाई काशिनाथ पाटील ह्या मयत झाल्यामुळे ही जागा रिक्त होती म्हणून त्या जागेवर त्यांची सून योगीता राहुल पाटील ह्या विजयी झाल्या आहेत म्हणजेच सासू मयत झाल्यामुळे आता सून ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय येथे मतमोजणीस प्रारंभ झाला तहसीलदार सुचिता चव्हाण नायब तहसीलदार एस पी शिरसाठ, यु बी निंबाळकर, अशोक सपकाळे, किशोरकुमार उपाचार्य, किशोर माळी एस के नंदनवार यांनी परिश्रम घेतले तर एरंडोल पोलीस स्थानकात तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.