अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करा-संघपाल पानाड

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील सुलतानपूर मंडळामध्ये 9 ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकरी व गावकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता 10 ऑक्टोंबर रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते,परंतु या निवेदनाची कोणत्याच प्रकारचा दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता मुंबई नागपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.


परतीच्या पावसाने 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने सुलतानपूर येथील नागरिकांच्या घरांची पडझड तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,शासनाने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत न दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते नागवंशी संघपाल पानाड यांनी गावकऱ्यांसोबत रस्ता रोको करण्यात आला.या आंदोलनासाठी पोलिसांकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार संजय रायमुलकर,तहसीलदार सैपान नदाफ,शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी,मंडळ अधिकारी यांनी काही नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली,इतरांना मदतीची आश्वासन दिले.यावेळी नागवंशी संगपाल पानाड,आदित्य घेवंदे,शेख अख्तर,मन्नान पटेल,भानुदास पवार,संतोष शिंदे,राजहंस जावळे,मनोहर भानापुरे,पंजाब पानाड,शेख वसीम व इतर ग्रामस्थ हजर होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार