विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत संगीत विभागाचा उद्घघाटन समारंभ संपन्न..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


कळंब :- ‌( ता. इंदापूर )
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत संगीत विभागाचा उद्घघाटन समारंभ दि.8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक 10 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.बाळासाहेब सावंत (अवर सचिव पर्यटन व सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई) संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते व विश्वस्त शिवाजी तात्या रणवरे, प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर, उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले. प्रसंगी मा.बाळासाहेब सावंत यांचा सत्कार संस्थेचे सचिव मा.विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विरसिंह रणसिंग यांचा सत्कार प्राचार्य आहेर सर यांच्या हस्ते करण्यात आला .


यावेळी बाळासाहेब सावंत यांनी हिंदी चित्रपटातील गीत गायन सादरीकरण केले आणि त्यांच्या गोड आवाजाने प्रेक्षकांना भावनिक व मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादरीकरण केले.त्यामध्ये नृत्य,गायन आणि वादन सादर केले.सौरभ नवगण या विद्यार्थ्याने जोगवा चित्रपटातील गीतावर नृत्य संकल्पना सादर केली. मुलींनी भोंडला सादर केला. प्रा. विद्या गुळीग यांनी चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील गीत गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कपिल कांबळे यांनी केले व आभारप्रदर्शन गुळीग सर यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार