निरगुडसर ( पुणे ) : – अचानक कोंबड्या व शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने घरासमोर झोपलेल्या ओंकार गणपत लोंढे या तरुणाने त्या दिशेने जाऊन पाहिले असता कोंबड्याच्या शेड जवळ बिबट्या होता आरडा ओरड केल्यानंतर बिबट्या शेडच्या पलीकडील बाजूने उडी मारून पसार झाला त्या दिशेला बॅटरी लावून पाहिले असता एक नाही चक्क चार बिबटे ही घटना वळती (ता. आंबेगाव )येथील लोंढे मळ्यात पहाटे अडीच वाजण्याचा सुमारास घडली आहे.
वळती गावठाणा नजीक लोंढे मळा असून या परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे . गेली अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे .अनेक वेळा बिबट्याचे दर्शन देखील शेतकऱ्यांना झालेले आहे.येथे राहणाऱ्या ओंकार गणपत लोंढे हा तरुण घरासमोरील शेडमध्ये झोपला होता.
गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याचा सुमारास त्याला अचानक कोंबड्या व शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने उठून पाहीले असता कोंबड्यांच्या शेड जवळ बिबट्या होता. ओंकार लोंढे याने आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने शेड च्या पलिकडच्या बाजूला उडी मारली व बांधाच्या दिशेला गेला .ओंकार याने बॅटरीच्या उजेडात बांधाच्या दिशेला पाहीले तर एक नाही चक्क चार बिबटे दिसले.त्यामध्ये तीन मोठे व एक छोटा बछडा होता. ओंकार लोंढे याने गुरुवारी सकाळी पहाणी केली असता तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळून आले असून लोंढे मळा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






