जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
भावनिक गुंतागुंतीत अडकून राहू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
वृषभ :-
फसवणुकीपासून सावध रहा. पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा. मित्रांच्या भेटीचे योग. विनाकारण शंका घेऊ नका.
मिथुन :-
मित्र परिवाराच्या स्नेहाला जपा. व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. तुमच्या कृतीला विरोध होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.
कर्क :-
भावंडांची साथ मिळेल. कला जोपासत राहावे. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल.
सिंह :-
जुनी कामे मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. आजचा दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.
कन्या :-
तुमचा करारी स्वभाव दाखवण्याची संधी मिळेल. नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. आहारावर नियंत्रण हवे.
तूळ :-
कोणत्याही मुद्यावर संभ्रमित होऊ नका. ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.
वृश्चिक :-
घरामध्ये मोठी खरेदी कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील. मुलांची चिंता सतावेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.
धनू :-
जनसंपर्कातून लाभ होईल. कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल.
मकर :-
पैसे खर्च करताना विचार करावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. काही वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हातातील कामे पार पडतील.
कुंभ :-
स्वकर्तृत्वावर झेप घ्या. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक असेल.
मीन :-
बोलताना पुढच्या-मागच्या गोष्टीचा विचार करावा. लाभाच्या संधी प्राप्त होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. कठीण कामे सुलभतेने होतील. अति तिखट पदार्थ खाऊ नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






