Viral Video : दारुड्याला चावल्यामुळे किंग कोब्राचा मृत्यू? मेलेल्या सापाला दवाखान्यात नेऊन म्हणाला, “डॉक्टर याला…” 

Spread the love

सोशल मीडिया म्हणजे अनेक चित्रविचित्र आणि मनोरंजक व्हिडीओ-फोटोची भरमार असणारं ठिकाण. यावर आपल्याला कधी काय बघायला मिळेल याचा नेम नाही. येथे आपण कधी मजेशीर, कधी गंभीर तर कधी अतिशय विचित्र व्हिडीओ पाहत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसावं की आश्चर्यचकित व्हावं असा प्रश्न पडेल.

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी गोंधळात पडले आहे. त्याचं झालं असं, उत्तर प्रदेशातील एक माणूस दारूच्या नशेत दवाखान्यात पोहोचला. यावेळी त्याच्याकडे एक मेलेला कोब्रा होता. यावेळी त्याने डॉक्टरांना जे सांगितलं ते ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. या इसमाने सांगितलं की त्याच्याकडे असलेल्या सापाने त्याचा दोनवेळा चावा घेतला आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की निळ्या रंगाचे शर्ट घातलेली व्यक्ती डॉक्टरांना सर्व माहिती सांगत आहे. साप कुठे चावला हेही तो डॉक्टरांना दाखवत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्याला चावल्यामुळे हा साप मरण पावला असल्याचं तो डॉक्टरांना सांगतोय. इतकंच नाही तर तो डॉक्टरांना या सापावर उपचार करण्यास आणि त्याला इंजेक्शन देण्यास सांगत आहे. हा इसम एका पिशवीमधून हा साप दवाखान्यात घेऊन आला होता.

https://www.instagram.com/reel/CjYFsR2p1S6/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार