लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील बिबी येथे धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणाच्या अंमलबजावणी सोबतच इतर मागण्या पूर्ण होण्यासाठी शासनाच्या विरोधात संभाजीनगर येथे 6 नोव्हेंबर रोजी आयोजित आक्रोश मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पद्मश्री खा. डॉ.विकास महात्मे यांनी लोणार तालुक्यातील बिबी येथे धनगर समाज बांधवांसोबत बैठक घेऊन आक्रोश मेळाव्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याची आवाहन केले आहे.
धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी,धनगर समाज एस.टी प्रवर्गाच्या आरक्षण अंमलबजावणी च्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती बऱ्याच वर्षा पासून सरकार विरोधात लढा देत आहे. मागील तीन वर्षापासून लागू असलेल्या योजनेचा व बाकी असलेल्या 3000 कोटी रुपयांचा निधी तात्काळ अंमलबजावणी करावी,यासह मेंढपाळांना स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावा,वनविभागाच्या मेंढ्यांच्या चाराई क्षेत्र मोकळे करावे व इतर काही मागण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने आक्रोश मेळावा आयोजन करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थितांनी पद्मश्री खासदार विकास महात्मे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तेजराव बिबे,विठ्ठल आटोळे,दिपक गुलमोहर,बबन आटोळे,श्रीधर आटोळे,भागवत आटोळे,पांडुरंग गावडे,बळी गावडे,आनंद आटोळे,दिपक धुमाळ,प्रफुल इंदोरिया,भागवत इवरे,गणेश आटोळे,गणेश उचाळ व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






