“माझ्या नादाला लागायचं काम नाही, याद राखा पुन्हा माझ्यावर बोललात तर” चित्रा वाघ यांचे भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर

Spread the love

मुंबई : – “माझ्या नादाला लागायचं काम नाय” तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही तर आम्ही आमच्या जीवावर लढतो. पूजा चव्हाण या तरुणीसाठी मी आधीही लढत होती. तेव्हा कुठं होतात, तोंडाला लकवा मारला होता की काय? याद राखा पुन्हा माझ्यावर बोललात तर…”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. “ओ…भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही ‘नाच्या’चं काम चांगलं करता… तेच करा. माझ्या नादी लागू नका, जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता तुमच्या?, असा सवाल करत चित्रा वाघ भास्कर जाधव यांच्यावर बरसल्या.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबीच्या कारवाईच्या निषेधार्थ भव्य मोर्चा पार पडला. या मोर्चाला संबोधित करताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांचा समाचार घेतला. यावेळी संजय राठोड यांचा दाखला देत भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांची मिमिक्रीही केली.

माझ्या नादाला लागायचं काम नाय… तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही तर आम्ही आमच्या जीवावर लढतो. पूजा चव्हाण या तरुणीसाठी मी आधीही लढत होती. तेव्हा कुठं होतात, तोंडाला लकवा मारला होता की काय? याद राखा पुन्हा माझ्यावर बोललात तर…”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं.

भास्कर जाधव यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका
भारतीय जनता पक्ष लॉन्ड्री पक्ष झालेला आहे. कथित भ्रष्ट माणसांना धुवून काढण्याचं काम भाजपची लॉन्ड्री करत आहे. ज्या नारायण राणेंवर भाजपने इतके आरोप केले, तेच राणे भाजपमध्ये गेल्यावर पवित्र झाले. ठाकरे सरकारमधील तत्कालिन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूप्रकरणात आरोप झाले. अगदी त्या प्रकरणी राठोडांचाच हात आहे, असा आरोप भाजपने केला. यात चित्रा वाघ आघाडीवर होत्या. त्याच चित्रा वाघ सध्या राठोडांविरोधात चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीका करताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांनी नक्कल केली.

टीम झुंजार