जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मनाची चंचलता जाणवेल. अती विचार करू नका. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा. कार्यक्षेत्रात मान मिळवाल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.
वृषभ :-
कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. जमिनीचे व्यवहार कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. अधिकारी वर्ग सकारात्मक बातमी देतील.
मिथुन :-
इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद संभवतात. बौद्धिक कसोटी लागू शकते.
कर्क :-
लहान प्रवास कराल. वडीलधार्यांना विरोध करू नका. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल. विरोधकांच्या कारवाया मावळतील. हस्तकलेत चिकाटी बाळगा.
सिंह :-
मानसिकरित्या खंबीर रहा. तूर्तास धाडसी निर्णय नकोत. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन विचार तत्काल अंमलात आणावा.
कन्या :-
किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप वाढू शकतो. तडजोडीला पर्याय नाही. कामात एकाग्रता ठेवा. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मित्रांना मदत कराल.
तूळ :-
अघळपघळ शब्द वापरू नका. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. तुमच्या बुद्धिकौशल्यावर लोक खुश होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.
वृश्चिक :-
मुलांबरोबर वेळ घालवाल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते. दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल. फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.
धनू :-
नातेवाईकांच्या गाठी पडतील. कौटुंबिक कामाने थकून जाल. तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
मकर :-
मुलाखतीत यश येईल. भावंडांची इच्छा जाणून घ्या. कामात उत्साह जाणवेल. दिवसभराच्या कामाचे चिंतन करा. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
कुंभ :-
योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. क्षुल्लक गैरसमजूत वाद वाढवू शकते. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील. मानसिक चलबिचलता वाढवू नका. भावंडांची मदत घ्यावी.
मीन :-
घाई-घाईने कामे करू नयेत. नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील. अनावश्यक खर्चाला आळा घालावा. नवीन कामाची रूपरेषा आखावी.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






